टपटप आवाज
पावसाचा, गारांचा, पागोळ्यांचा..
सुगंधाची उधळण
मातीतून, किटलीतून, शेजारच्या स्वयंपाकघरातून..
मी मात्र गच्चीत
दोरीवरचे कपडे पटापट काढण्यात, चपला आत आणण्यात,
मेणबत्ती शोधून ठेवण्यात.. !
मग शोधाशोध
काडेपेटीची, छत्रीची, रेनकोटची..
हळूच नजर
लाईटकडे, खिडकीतून दिसणार्या रस्त्याकडे,
तापत ठेवलेल्या दुधाकडे..
रेनकोट सापडतो !!
मळलेला, फाटलेला, उसवलेला..
त्यावर डाग
चिखलाचे, भिंतींच्या रंगांचे
आणि.....
तिच्या लग्नात तिने हातावर काढलेल्या ओल्या मेंदीचे !!
या सगळ्यापेक्षा मग
भिजलेलंच परवडतं.........
पावसाचा, गारांचा, पागोळ्यांचा..
सुगंधाची उधळण
मातीतून, किटलीतून, शेजारच्या स्वयंपाकघरातून..
मी मात्र गच्चीत
दोरीवरचे कपडे पटापट काढण्यात, चपला आत आणण्यात,
मेणबत्ती शोधून ठेवण्यात.. !
मग शोधाशोध
काडेपेटीची, छत्रीची, रेनकोटची..
हळूच नजर
लाईटकडे, खिडकीतून दिसणार्या रस्त्याकडे,
तापत ठेवलेल्या दुधाकडे..
रेनकोट सापडतो !!
मळलेला, फाटलेला, उसवलेला..
त्यावर डाग
चिखलाचे, भिंतींच्या रंगांचे
आणि.....
तिच्या लग्नात तिने हातावर काढलेल्या ओल्या मेंदीचे !!
या सगळ्यापेक्षा मग
भिजलेलंच परवडतं.........
Waa ! mast
ReplyDeleteHahaa...chhaaan!!!!! Sugandh...maatitun...kitlitun..waah!
ReplyDelete