श्शी...
किती भित भित जगायचं?
पैसे कमावायची भीती
कमावलेले साठवायची भीती
साठवलेले परत मिळवायची भीती
नकार येईल याची भीती
होकार आलाच तर लग्नाची भीती
लग्न झालंच तर टिकण्याची भीती
ठणठणीत असताना रोगांची भीती
रोग झालाच तर पथ्याची भीती
पथ्य पाळुनही सातत्याची भीती
ओळख झाली तर नात्यांची भीती
नातं जुळलंच तर राहण्याची भीती
टिकलंच तर तुटण्याची भीती
थोरा-मोठ्यांची भीती
लहान-छोट्यांची भीती
आपल्या वाढणा-या वयाची भीती
पद मिळवायची भीती
ते शाबूत ठेवायची भीती
त्याच्या जबाबदारीची भीती
सरकारची भीती
पोलिसांची भीती
चोरांची भीती
मनातलं सांगण्याची भीती
सांगितलेलं कळण्याची भीती
कळलेलं वळण्याची भीती
जन्मलो याची भीती
मरण्याची भीती
आणि शेवटी पुनर्जन्माचीही भीती
सगळ्या सगळ्याची भीती
श्शी...
किती भित भित जगायचं?